जिल्हा सामान्य रुग्णालयात मोकाट कुत्र्यांचा वावर
जिल्हा सामान्य रुग्णालयात मोकाट कुत्र्यांचा वावर
रुग्णासह डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : सध्या कोरोनामुळे स्वच्छतेवर प्रशासन तसेच नागरिक विशेष लक्ष देत आहे, असे असले तरी जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र डॉक्टर, नर्स, रुग्णासह चक्क मोकाट कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर बघायला मिळत आहे. यामुळे रुग्णासह तेथील डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
कोविडमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पाश्वभूमीवरी आरोग्याकडे व
विशेष लक्ष देण्यावर भर आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्यातील गोरगरीब नागरिक मोठ्या आशेने येतात. मात्र येथेही त्यांची हेळसांड होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या आत मोकाट कुत्र्ये मुक्तसंचार करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एखाद्यावेळी रुग्णाला चावा घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारमुळे आरोग्य यंत्रणेची सुरक्षा व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकाराकडे आरोग्य प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे
या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.



