एकाच वेळी हडपसर आणि कोथरूड परिसरात व्यावसायिकांचा खून,
एकाच वेळी हडपसर आणि कोथरूड परिसरात व्यावसायिकांचा खून,
विदर्भ 24 न्यूज़
ऑनलाइन/पुणे:- एकाच वेळी दोन तरुणांचे तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून झाल्यानंतर शहर हादरून गेले. काही वेळेच्या फरकांनी या घटना घडल्या असून अद्याप हल्लेखोराना पकडण्यात आलेले नाही. हडपसर आणि कोथरूड परिसरात या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील खुनाचे सत्र थांबत नसल्याचे दिसत आहे. आकाश लक्ष्मण भोसले ( वय .२४, रा . हडपसर ) असे खून झालेल्या तरुणाच नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार , भोसले हा एका नामांकित कंपनीच्या चिकन वितरकाकडे वसुलीचे काम करत होता. दरम्यान दुपारच्या सुमारास तो साडेसतरानळी येथे एका दुकानात पैसे घेण्यासाठी आला होता. त्यावेळी दोन हल्लेखोर दुकानात आले. त्यांनी त्याच दुकानातील सत्तुर घेऊन भोसले याच्यावर सपासप वार केले. आकाश दुकानात शिरल्यावर देखील त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. आकाश रक्ताच्या थारोळ्यात दुकानातच पडला होता. ही माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर पसार झाले असून , त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी तपासासाठी दुकानदाराला ताब्यात घेतले आहे. तर त्याचवेळी कोथरुड परिसरातील गांधी भवनसमोर राकेश क्षिरसागर ( वय २५ , रा . कोथरूड ) या गॅरेज चालकाचा भररस्त्यात धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. हा प्रकार बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. हल्लेखोर घटनास्थळावरून जात असताना त्यांनी फिल्मी स्टाईल तलवारी आणि कोयते दस्त्यावर घासत अंडी गोंधळ घालत नेले. यामुळे काही काळ परिसरात दहशतीचे वातावरण होते. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कोथरूड पोलिसांनी येथे धाव घेतली. दोन्ही खून पूर्ववैमनस्यातून झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पुणे शहरात आज एकाच वेळी दोन निघृण हत्या झाल्याने मोठी खळबळ माजली आहे.




