लाॅकडाऊन कालावधीतील वीजबील ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवा:-बि.आर.एस.पी.
-लाईट जाते रातभर, पण बिल येते हातभर
-उर्जा मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळण्या संदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टिचे मुख्यमंत्र्यांना निवेदन,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/देसाईगंज :- कोरोना महामारीमुळे व लाॅकडाऊनमुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले असताना लाॅकडाऊन कालावधीत घरकुती विजीधारकांना भरमसाठ वीजबील देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवुन मा.उर्जामंत्र्यांनी दिलेल्या १०० युनिट विज मोफत देण्याचे आश्वासन पाळण्यात यावे, याबाबत गडचिरोली जिल्हा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टिच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्वव ठाकरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.वाढीव वीजबिलं त्वरित रद्द कारावीत.जे सध्या ३ महिन्याचे विजबिल आपण एकत्र पाठवले आहे ते ३ महिन्यात विभागून देणे व प्रत्येक बिल हे भरण्याची मुदत १ महिन्याची वाढीव देणे. ह्या लॉक डाऊन काळात आलेले अतिरिक्त वीज बिल भरण्यासाठी किमान ४ महिने मुदत द्यावी.व त्यावर कुठल्याही प्रकारचा दंड अथवा कर लावू नये. सदर वरील मागण्या मान्य न झाल्यास आमच्या पक्षामार्फत आपल्या कार्यालयावर तीव्र पध्दतीने निदर्शने करण्यात येतील. याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या महावितरण कंपनीची असेल असे अव्हान केले आहे.निवेदन देताना BRSP गडचिरोली अध्यक्ष राज बन्सोड, युवा आघाडी प्रमुख प्रतीक डांगे, विवेक बारसिंगे, वडसा युवा आघाडी चे तालुकाध्यक्ष सचिन वैद्य, पियुष वाकडे, मुकेश वैद्य उपस्थित होते.




