लाकडाऊन काळातील विज बिल माफ करा
लाकडाऊन काळातील विज बिल माफ करा अभिजित कुडे यांचे राज्य मंत्री यांना निवेदन
रायुकॉ वरोरा मागणी
राज्य ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांना निवेदन
विद्युत कंपणीने रविवारपासून विज बिल वाटपाला सुरवात केलेली आहे.तिनं महिन्यांचे एकत्रित बिलाचा आकडा पाहून सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.लाकडाऊन मुळे आर्थिक अडचण सुरू असताना मोठ्या रकमेचे बिल हाती पडल्याने ग्राहकांना शॉक बसत आहे.कोविड -१९ चा प्रकोप रोखण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लाकडाऊन सुरू केले.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेक छोटे मोठे उद्योगधंदे बंद झाले.अनेकजण बेरोजगार झाले.

त्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह करने अडचणीचे जात आहे.यातच महावितरणच्या वतीने तिनं महिन्यांचे विद्युत बिल नागरिकांच्या घरी पाठविले आहे.आर्थिक संकटात असताना आलेले हे विज बिल भरायचे कसे असा प्रश्न हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांसमोर निर्माण झालेला आहे.त्यामुळे लाकडाऊन काळातील विज बिल माफ करून सर्वसामान्य शेतकरी, मजूर गोर गरिबांना दिलासा द्यावा या मागनीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा तर्फे रा.यु.कॉ जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,विधासभा अध्यक्ष विलास नेरकर, यांच्या मार्गदर्शनात राज्य मंत्री यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष दिनेश मोहारे, तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे ,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे ,राष्ट्रवादी किसान सेल तालुका अध्यक्ष विजय धंद्रे, युवक शहर अध्यक्ष योगेश लोहकरे, शहर अध्यक्ष राजू वरभे, बंडूजी डाखरे ,रोशन भोयर उपस्थित होते.



