अपंग बांधवांसोबत निराधार वृद्धांसोबत साजरा केला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला वाढदिवस-प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय चंद्रपूर
अपंग बांधवांसोबत निराधार वृद्धांसोबत साजरा केला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला वाढदिवस–प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय चंद्रपूर
आज सन्माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय चंद्रपूर यांच्याकडून श्री बच्चू कडू यांचा 51 वा वाढदिवस असल्याने 51 दिव्यांग बांधवांना अन्नधान्यांचे किट वाटप करण्यात आले तथा 51 वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण देखील करण्यात आले. याशिवाय जिल्हा रुग्णालयांमध्ये फळांचे वाटप देखील करण्यात आले. तथा मातोश्री वृद्धाश्रमांमध्ये निराधार वृद्ध यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जेवणाचा कार्यक्रम करून जेवण देऊन, श्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस असे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्री सुरज ठाकरे सपत्नीक उपस्थित होते व याशिवाय प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुल चव्हाण ,सूर्य आड बले, सनी चव्हाण, निखिल बजाइत, बबलू चव्हाण, ईशान शेख, जगदीश साठवणे, भूपेंद्र साठवणे, शुभम सोयाम, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते



