मार्च ते मे पर्यंतचे घरघुती वीजबिल माफ करावे अशी जेप्रा गावातील लोकांची मागणी.
मार्च ते मे पर्यंतचे घरघुती वीजबिल माफ करावे अशी जेप्रा गावातील लोकांची मागणी.
लॉकडाऊन काळातील मार्च ते मे काळातील घरघुती वीजबिल माफ करावे अशी मागणी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे विनंती करत आहेत. कोरोनाच्या पार्शभूमीवर काही घरघुती विज ग्राहकांनी दिलासादर्शक निर्णय घेतले होते. ग्राहकांना 100 युनिट पर्यंत मोफत विज देण्याची योजना आखली होती.मात्र या योजनेची अमलबजावणी केली नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्शभूमीवर अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आता २०० ते २५००० रुपये विजबिल भरावे लागत असल्यामुळे विज ग्राहकांना त्रास सहन कराव लागत आहे. विजबिल भरावे तरी कसे, पावसाच्या दिवसात अंधारात राहावे तरी कसे. हा प्रश्न लोकांना पडला आहे. यामुळे वीजबिल माफ करावे अशी मागणी जेप्रा येथील लोकांनी केली आहे.



