राजूरा हनुमान नगर वार्ड क्र.२ मधिल रस्त्याच्या मधात आलेला इलेक्ट्रिक पोल स्थलांतरित करण्यात यावा नागरिकांची मागणी.
आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज राजूरा शहर प्रतिनिधी.
*राजूरा हनुमान नगर वार्ड क्र.२ मधिल रस्त्याच्या मधात आलेला इलेक्ट्रिक पोल तातडीने स्थलांतरित करण्यात यावा नागरिकांची मागणी*

इलेक्ट्रिक पोल न काढता रस्त्याचे बांधकाम पूर्ण. राजूरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी चे दुर्लक्ष.
राजूरा नगर परिषदेच्या हदित येणारे बामणवाडा रोड येतिल हनुमान नगर वार्ड क्र.२(आंबेडकर वार्ड) मधिल रस्त्याच्या मधात आलेला इलेक्ट्रिक पोल स्थलांतरित करण्यात यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे..
गेल्या सहा ते सात महिन्या पासून येते सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे.. रस्त्याचा मधोमध इलेक्ट्रिक पोल असताना सुद्धा रस्ता बांधन्याची राजूरा मुख्याधिकारीनी त्या वार्डाचे काँग्रेस चेे नगरसेवक श्री.गजानन भटाळकर याना परवानगी कशी काय दिली असे हनुमान नगरवासीयांचे म्हणने आहे… नगरवासीयानी बरेच वेळ रस्त्याचा मधोमध आलेल्या इलेक्ट्रिक पोल ला बाजूला स्थालांतरीत करन्या सांगितले पण त्यांनी या कडे दुर्लक्ष केल्याचे नगरवासीयांचे म्हणने आहेत..
आज दिनांक ३जुलै २०२० ला राजूरा नगर परिषद मुख्यधिकारी मैडम ला पुन्हा निवेदन दिले आहे… भविष्यात त्या वार्डातील नागरीकांची चार चाकी वाहने घरा पर्यंत न घेऊन जाता मेन रोड चा कडेला पार्किंग करावी लागेल त्या पोलचा खुप मोठा अर्थडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
राजूरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ने तातडीने लक्ष द्यावेत अशी मागणी हनुमान नगरवासीयांनी केली आहे..



