जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची प्रा. आ. केंद्र लोंढोली येथे सदिच्छा भेट.
जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची प्रा. आ. केंद्र लोंढोली येथे सदिच्छा भेट.
बुधबुल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोणा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सावली तालुक्यातील लोंढोली प्रा. आ. केंद्राला सदिच्छा भेट दिली.
याठिकाणी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचेकडून स्थानिक आरोग्यासंबंधी अनेक विषयांसह कोरोणा महामारीच्या काळात स्थानिक पातळीवर चालवलेल्या आरोग्य सुविधा व खबरदारी यांची माहिती घेतली. ज्यामधे बाहेरून आलेल्या किती व्यक्तींना गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे, प्रा. आ. केंद्रात औषधी, सॅनिटायझर तसेच मॉस्क उपलब्ध आहेत की नाही, शिवाय पावसाळ्याच्या दिवसांत सावली पट्ट्यात अनेक साथीचे रोग थैमान घालतात त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व्हावी. यासाठी लक्ष घाला. प्रा. आ. केंद्रात स्वच्छता ठेवण्यास प्राधान्य द्या. आणि कोरोणा विषाणूचा संक्रमण कमी व्हावे या खबरदारीसह हत्तीरोग, मदूमेह आणि कॅन्सरसारख्या आजाराबाबतही नागरिकांत जनजागृती करा. असे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिले. तसेच यावेळेस त्यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी देखील केली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. देवतळे, डॉ. पवार, आरोग्य सहाय्यक, यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.



