Vidarbh24News

Latest Online Breaking News

नायब तहसीलदार राजू धांडेवर रेती तस्करांचा प्राणघातक हल्ला.

नायब तहसीलदार राजू धांडेवर रेती तस्करांचा प्राणघातक हल्ला.
पठाणपुरा जवळील इरई नदीपात्रातील घटना!
साबिर व जहांगिर सिद्दीकीवर भादंवि च्या अंतर्गत गुन्हे दाखल!
चंद्रपूर :
चंद्रपूर मध्ये काळे धंदेवाले मोठ्या प्रमाणात आपले डोके वर काढित आहे. आज बुधवार दिनांक एक जुलै रोजी पठाणपुरा गेट जवळील जमणजट्टी परिसरातील नदीच्या पात्रातून रेतीची तस्करी करताना चंद्रपूर चे नायब तहसीलदार राजु धांडे व त्यांच्या चमुंनी धाड टाकली असता त्या ठिकाणी रेती डोहाळतांना त्यांना काही इसम व ट्रॅक्टर दिसले, त्यातीलच साबिर व जहांगीर सिद्धीकी यांनी त्यांच्यावर हमला केला, या हल्ल्यानंतर तहसील विभागाने चार ट्रॅक्टर जप्त केले व राजु धांडे यांच्या तक्रारीवर साबीर व जहागीर सिद्दिकी, रा. लालपेठ कॉलरी, चंद्रपूर यांच्यावर भादंवीच्या 353, 332, 186, 34 व 506 अंतर्गत चंद्रपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले महत्त्वाचे म्हणजे चोरांना आज आम्ही चुकी करत आहोत याची भीती नाही, आम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे असे वाटत आहे. हे समाजासाठी व कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक आहे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्वाचे आहे. याप्रकरणी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच-३४-एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच-३४ एबी ३०९०, राकेश देशमुख यांच्या मालकीच्या एमएच-३४ एल ८८५७ क्रमाकांच्या ट्रॅक्टर रेती तस्करी सुरू होती.या पथकाने वाहनांच्या मालकांवर कारवाई करीत वाहन जप्त केनले. याच दरम्यान जहागीर सिद्धीकी याच्या मालकीचा एमच-३४-४००६ या क्रमांकाच्या हॉफटनद्वारे रेती तस्करी करीत असताना पथकाने ट्रकला पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला असता हा हल्ला करण्यात आला.

आज कोरोनाच्या भयावह स्थितीनंतर जिल्ह्यात दारू, कोळसा, रेती, सुगंधित तंबाखू यांची मोठ्या प्रमाणावर होणारी तस्करी हा संशोधनाचा विषय आहे. या तस्करांच्या पाठीमागे असलेले राजकीय पाठबळ याचाही याठिकाणी विचार व्हायला हवा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या व्यवसायावर कुठेतरी आळा बसायला हवा. लाॅकडाऊनच्या काळात जिल्ह्यात पुरवठा अधिकारी सोनकुसरे, रामनगर पोलिसांचे एपीआय जीवन लाकडे व ताजे प्रकरण असलेले चंद्रपूर चे नायब तहसीलदार राजु धांडे यांच्यावर झालेला हमला ही जिल्ह्यासाठी अत्यंत लाजिरवाणी घटना आहे.

जमनजेट्टी परिसरातील इरी नदीच्या पात्रात मागील अनेक वर्षापासून रेतीची तस्करी सुरू आहे, या तस्करांना सुरुवातीपासूनच राजकीय पाठबळ असल्याचे रेत्ती तस्कर खुलेआम सांगतात, त्यातूनच आज नायब तहसीलदारावर झालेला हल्ला हे त्याचे प्रमाण आहे.
इरई नदीच्या पात्रात होणारी तस्करी हा लहानसा विषय नाही, काही मोजके तस्कर याठिकाणी आपले कार्य बजावत असतात परंतु याच्या पर्यावरणावर काय परिणाम होतो, याचे भान या चोरट्यांना बिलकुल नाही, ज्या अधिकाऱ्यांना यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तेच कर्तव्य बजावणारे अधिकारी फक्त राजकीय पाठबळ आहेत म्हणून मागे-पुढे पाहतात व दुर्घटनेला सामोरे जावे लागते, आजची घटना ही तशीच आहे. आजपासून चार-पाच वर्षांपूर्वी याच डोहामध्ये भिवापूर वार्डातील आई-वडीलाला एकुलता एक असलेला मुलगा डोहात डुबून मरण पावला होता, प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी यावर मोठी हळहळ व्यक्त केली होती, ती चुकी सुद्धा रेती तस्करामुळे घडली होती हे बहुतेक आता प्रशासन आणि राज्यकर्ते विसरले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नगर येथे रेतीच्या ढिगारा खसून एक महिला मृत पावली होती, अवैध रेती तस्करीचे ते प्रकरण होते, परंतु संबंधित विभागाला याठिकाणी अशी रेती तस्करी होते याची कल्पना नव्हती, साधी दुर्घटना म्हणून या प्रकरणाची नोंद करण्यात आली मग माणुसकी मेली आहे कां? ज्यांच्याकडे यावर कर्तव्य निभावण्याची जबाबदारी आहे ते आपली जबाबदारी कां बरं झटकत आहे? याचाही विचार यानिमित्ताने व्हायलाच हवा? राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चोरांना किती साथ द्यायची आहे हे ठरवायला नको कां? जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी यावर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे? राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांनी चन्द्रपूरात वारंवार अधिकाऱ्यांवरील हमल्याच्या घडणाऱ्या या घटनांचा अभ्यास करून योग्य ते निर्देश संबंधितांना द्यावेत, एवढीच यानिमित्ताने अपेक्षा!

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!