जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यलय , जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली, विभागाची कारवाही
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यलय , जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली, विभागाची कारवाही
महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्षाने 16 वर्षीय बालिकेचा विवाह रोखला हा विवाह दिनांक 30/6/2020रोज मंगळवार रात्री नऊ वाजेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील बोरी (राजपूर (पंच) येथे लावण्याचे ठरले होते महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी वेळीच पोहोचून हा विवाह रोखला.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, बाल विवाह कायदा 2006 अंतर्गत पालकांडून जबाब नोंदविण्यात आला, पालकांना व गावातील प्रतिष्ठित जमलेल्या गावकर्यांना बालविवाह कायद्याने गुन्हा आहे त्याचे सामाजिक, शारीरिक दुष्परिणाम बाबत ही समुपदेशन केले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी या गुन्ह्याच्या परिणामाबाबत व होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती दिली.
ही कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री अतुल भडांगे यांच्या मार्गदर्शनात
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री अविनाश गुरनुले, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक )श्री कवेश्वर लेनगुरे, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) श्रीमती प्रियंका आसुटकर व क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी केली .त्यावेळी गावातील पोलीस पाटील श्री विलास निकेसर , सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी योगिता गुरनुले, गावातील उपसरपंच सुरेश गंगाधरीवार व सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरनुले इत्यादी उपस्थित होते
कोणत्याही बालकाला काळजी व संरक्षणाची गरज असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली, व १०९८ (चाईल्ड लाईन)या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आव्हान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केला आहे.व अशा प्रकारे होणारे बेकायदेशीर बालविवाह बाबत आपल्या गावात स्थापन असलेल्या गाव बाल संरक्षण समिती मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले



