कवठी येथील कमलाकर बट्टे यांच्या बैलजोडीचा विज पडून मृत्यू

कवठी येथील कमलाकर बट्टे यांच्या बैलजोडीचा विज पडून मृत्यू
कवठी प्रतिनिधी
सावली तालुक्यातील कवठी येथील कमलाकर बट्टे यांच्या दोन्ही बैलावर विज पडल्यामुळे मृत्यु झाल्याची घटना सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.कमलाकर बट्टे यांनी आपले दोन्ही बैल नेहमी प्रमाणे आपल्या आंगणातील झाडाला बांधून ठेवले होते.अचानक विज कोसळल्यामुळे दोन्ही बैलाचा जागीच मृत्यु झाला आहे.समोर शेतीची कामे असतांना जीवापाडाची जोडी गेल्याने शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.हंगामाचे दिवस असल्याने नविन बैलजोडी कुठून मिळणार? शेती नाही झाली तर कुटुंबाचे पोट कसे भरणार?अशा अनेक प्रश्न त्या शेतकऱ्यांच्या समोर येत आहेत. कवठी येथील कमलाकर रूमाजी बट्टे यांच्या बैलजाेडीवर विज पडल्यामुळे दाेनही बैल मरन पावले आता त्यांची शेती करणे कठीन झाले आहे, त्यांचा लाखाे रूपयांचा नुकसान झालेला आहे तरी शासनाने त्वरीत नुसकान भरपाई सदर शेतकऱ्याला देण्यात यावी अशी मागणी परिसरातील लोक करीत आहेत.सदर घटनेची माहिती मिडताच साजा खेडीचे कोतवाल श्री कोसरे यांनी मोका चौकशी केली त्यावेळी उपसरपंच देवराव चिताडे तं मु स अध्यक्ष टीकाराम म्हशाखेत्री बेंडूजी बोरकुटे प्रकाश घोटेकार रमेश बट्टे विनोद धोटे उपस्थित होते