घोरपळ प्रकरणातील वनरक्षक निलंबित
घोरपळ प्रकरणातील वनरक्षक निलंबित
वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्र अंतर्गत अक्सापुर गावात 24 जून रोजी स्थानिक वनरक्षकांनी लोकांकडून घोरफड पकडली. सदर प्रकरणी आक्सापुर येथील मारुती नेवारे, गणेश सातपुते व त्याच्या वडील महेंद्र सातपुते यांना 29 जून रोजी अटक करून वन विकास महामंडळाने त्यांना गोंडपिपरी न्यायालयात हजर केले. वनरक्षक यांनी प्रकरण सेट केल्याची चर्चा चांगलीच रंगली. आरोपीने देखील पकडलेली घोरपड वनकर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले.घोरपडीला घटनेच्या दिवशी जंगलात सोडण्याचे बयान वनरक्षकानी चौकशी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान या प्रकरणासंदर्भात त्यांनी वरिष्ठांना कुठलीच कल्पना दिली नव्हती. घटना घडल्या त्या दिवशीच्या कुठलाच पुरावा म्हणून वनरक्षकाकडे उपलब्ध नसल्याची चर्चा वनवर्तुळात सुरू असताना घटनेच्या तीनही आरोपींना न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. दरम्यान पकडलेली घोरपड गेली कुठे हा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याच वेळी वनरक्षकावर देखील पथकाने शिकंजा कसला आहे. त्याची चौकशी देखील वनअधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. सोमवारी अचानक बल्लारपूर येथील विभागीय व्यवस्थापक एन रेड्डी यांनी वादग्रस्त ठरलेल्या वनरक्षकला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.



