राजुरा येथील वर्धा नदीच्या सास्ती पुलावरून आजएका युवकाने मारली उडी.

आशिष यमनुरवार विदर्भ 24न्युज राजूरा शहर प्रतिनिधी 8855994001
राजुरा येथील वर्धा नदीत एका युवकाने मारली उडी शोधकार्य कार्य सुरू असून अद्याप काहीच हाती लागलेले नाही
राजुरा येथील वर्धा नदीच्या सास्ती पुलावरून आज सकाळी १० च्या दरम्यान निलेश शेरकी वय २१ वर्ष राहणार सहकार नगर रामपूर येथील एका युवकाने उडी घेतली.या युवकाने आपली गाडी आणि मोबाईल फोन पुलावर सोडून उडी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
आज सकाळी ११ वाजातपासून शोध कार्य सुरू असून अद्याप पथकाला यश आले नाही.पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे.