प्रहार जनशक्ती पक्षाने खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साहाय्य पकडले अवैध उत्खनन करणारे सहा ट्रॅक्टर, – चंद्रपूर येथील घटना- सुुुरज भाऊ ठाकरे.
आशिष यमनुरवार विदर्भ 24न्युज राजूरा शहर प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाने खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साहाय्य पकडले अवैध उत्खनन करणारे सहा ट्रॅक्टर, – चंद्रपूर येथील घटना- सुुुरज भाऊ ठाकरे.
दिनांक २६/०६/२० रोजी c.t.p.s येथून जात असताना मान कंपनी च्या समोर रेतीने भरलेले ट्रॅक्टर झाडाच्या आड लपवून असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरज ठाकरे यांना दिसले त्यांनी त्या ठिकाणी गाडी थांबवून स्वतःच्या कार्यकर्त्यां सोबत आत मध्ये जाऊन बघितले असता गौण खनिजाच्या उत्खननाचा प्रकार आढळून आला व एक नव्हे तर तब्बल सहा ट्रॅक्टर त्या ठिकाणी उभे होते व किमान 16 ते 17 फुटाचे खड्डे त्या ठिकाणी उत्खनन करून या ट्रॅक्टर चालकांच्या द्वारे करण्यात आले होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याने त्या ठिकाणी एवढे मोठे खड्डे पडले आहेत व या मुळे पर्यावरणाचे नुकसान देखील यामुळे होत असल्याचे लक्षात आले त्याठिकाणी ट्रॅक्टर मालकांना व चालकांना विचारणा केली असता आम्ही पुनर्वसन वाले आहोत आम्हाला वेकोली ने परवानगी दिलेली आहे आम्हाला पुनर्वसनाच्या जागी भरण टाकण्याची परवानगी तहसीलदार व वेकोलि यांनी दिली आहे असे सांगून एक खोटे पत्र त्यांनी दाखवले त्या पत्राची शहानिशा करण्याकरता वेकोलिचे एरिया मॅनेजर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा प्रकारची कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सुरज ठाकरे यांना सांगितले त्यानंतर सूरज ठाकरे यांनी खानिकर्म विभागाच्या महिला अधिकारी खेडेकर यांना संपर्क केला व तात्काळ आपण या ठिकाणी येऊन या सर्व गोष्टीची शहानिशा करावी व हे खनन वैध्य आहे की अवैध्य हे तपासावे ही विनंती केली खणीकर्म विभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह 35 ते 40 मिनिटांनी त्या ठिकाणी दाखल झाले. हा सर्व प्रकार पाहिला असता त्यांना देखील धक्काच बसला व त्याने सांगितले की जिल्ह्यामध्ये कुठेही अशा प्रकारच्या खननाची परवानगी महसूल विभागा द्वारे देण्यात आलेली नाही त्यामुळे ही खोटी परवानगी नेमकी कोणी बनवून दिली याचा देखील शोध घेणे हे आवश्यक असल्याचे प्रहारचे सुरज ठाकरे यांनी म्हटले आहे हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर ट्रॅक्टर चालक विनवणी करत होते याशिवाय जिल्ह्यातील मोठ्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची नावे देखील त्या ठिकाणी सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत होते परंतु खनन विभाग व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते कुठल्याही दबावाला बळी न पडता कार्यवाही करून सर्वच्या सर्व सहा ट्रॅक्टर हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आले ट्रक चालकांचे व चालक मालकांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत काही दिवसा आधीच राष्ट्रवादी नगर येथे अशा प्रकारामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला तरी देखील हे रेती माफिया काही सुधारायला तयार नाही असा एकंदर प्रकार दिसत आहे माणुसकी संपली असून फक्त पैशासाठी काहीही करायला आज हे माफिया तयार आहेत , सामान्य जनतेने सतर्क राहून अश्या अवैद्य उत्खननाबाबत माहिती प्रशासनाला द्यावी असे खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.



