चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी निखिल सोनवणे यांची फेरनिवड,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/जळगाव :- दिनांक 28 जून 2020 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन चाळीसगाव शाखा तालुका अध्यक्ष पदी येथील पोलीस बॉईज असलेले निखिल दिलीप सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. निखिल सोनवणे हे सन 2016 पासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांच्या अडचनी सोडवण्यासाठी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असतात.पोलीसांच्या समस्या संदर्भात निखिल सोनवणे यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली, निवेदने दिली असून पोलीसांसाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यामुळे त्यांची ही , उल्लेखनीय कामगिरी पाहून, पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक – अध्यक्ष श्री.प्रमोद वाघमारे यांनी निखिल सोनवणे यांची चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड केली आहे, व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या निवडीबद्दल निखिल सोनवणे यांचे सर्व जिल्हा स्तरावरुण अभिनंदन केले जात आहे.



