आरोपी कडून पकडलेल्या घोरपडीवर वनरक्षकांनीच मारल ताव
आरोपी कडून पकडलेल्या घोरपडीवर वनरक्षकांनीच मारला ताव
वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु
गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर गावातील दोन व्यक्तींनी घोरपडीची शिकार केल्याची माहीती वनरक्षकाला मिळाली. या माहीतीच्या आधारे आक्सापुरातील वनरक्षक यांनी भर चौकात त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे घोरपड आढळून आली. तेव्हा वनरक्षकाने त्या दोघांनाही गावकर्याःच्या समक्ष ताब्यात घेऊन कार्यवाहीसाठी झरन येथील आरएफओ कार्यालयाकडे निघाले. तेव्हा वातेतच कार्यवाही न करन्याच्या नावावर वनरक्षकानी अर्थपूर्ण व्यवहार केला. त्याच्या जवळ असलेली घोरपड वनरक्षकांनीच ठेऊन ताव मारल्याची चर्चा रंगु लागल्याने याची कुनकून एफडीसीएमच्या अधिकार्यांना मिळाली. तेव्हा आज एफडिसिएमचे वरीष्ठ अधिकारी चौकशीला लागले आहे. यामुळे ती घोरपड गेली कुठे? त्या वनरक्षकावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



