प्रकल्पग्रस्तांचे विरुगिरी आंदोलन
प्रकल्पग्रस्तांचे विरुगिरी आंदोलन
चक्क तीन व्यक्ती चढले टॉवरवर
वेकोली ने भूसंपादन करून अनेक वर्षे लोटली असून अजूनही वेकोलिच्या कित्येक प्रकल्पग्रस्तांना नौकरीत सामावून घेतल्या गेले नाही. वारंवार निवेदने देऊन, लहान मोठे आंदोलन करूनही ह्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही कुठलाही लाभ झालेला नसल्याने शेवटी आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. प्रकल्पग्रस्त तीन युवक हे टॉवर वर चढून आंदोलन करीत आहे.
थोडक्यात वृत्त असे कि, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती, भडांगपूर, कोलगाव मानोली, धोपटला, माथराव इतर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलिने अधिग्रहित केल्या आहेत परंतु नियमाप्रमाणे अजूनही त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. वेकोली प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन सुद्धा वेकोली प्रशासनाकडून वेळकाढूपणा करण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बंध फुटला असून आज ह्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. प्रकल्पग्रस्त मारोती मावलीकर, संजय बेले, विलास घाटे हे प्रकल्पग्रस्त चक्क वेकीलीच्या धोपटला परिसरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन करीत आहेत.



