राष्ट्रवादी चंद्रपूर महिला शहर काँग्रेस तर्फे गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध – सौ.चारुशीला बारसागडे चंद्रपुर शहर कार्याध्यक्ष रा.कॉ पार्टी.
आशिष यमनुरवार विदर्भ 24न्युज राजूरा शहर प्रतिनिधि मो. 8855994001.
*राष्ट्रवादी चंद्रपूर महिला शहर काँग्रेस तर्फे गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध*
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
यांच्यावर काल टीका करणार्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस चंद्रपूर शहर आक्रमक झाली असून आज चंद्रपूर येथील बाबूपेठ आंबेडकर चौक येथे शहर कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला.
या वेळेस विधानसभा अध्यक्ष सुनील काळे किसन सेल चे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज नितीन पिंपलशेंडे युवक प्रभाग अध्यक्ष विशाल गेडाम आंबेडकर नगर प्रभाग अध्यक्ष सारिका ताई रामटेके अष्टभुजा प्र अध्यक्ष अनिता ताई रामटेके चुनारकर ताई दुर्गे ताई सविता मेश्राम बोकडे भाऊ वाघमारे ताई आणि बाबूपेठ परिसरातील नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर टीका करणार्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



