बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुकप्रदर्शन,
सर्व माजी खासदार – आमदार यांची पेन्शन बंद करुन सर्व रक्कम कोरोणा संघर्षात वैद्यकिय सेवेसाठी लावावी, जिल्हाधिकारी व्दारा मा. मुख्यमंत्री सा.यांना विविध मागण्याचे निवेदन,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली:- आज दिनांक २५ जुन २०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी महाराष्ट्रातील गोर गरीब वर्ग संबंधात व अर्थव्यवस्था सबंधात अत्यंत महत्वपुर्ण ५ विषयावर केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व योग्य कारवाईकरिता बिआरएसपी तर्फे मुकप्रदर्शन सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत करुन निवेदन देन्यात आले, महाराष्ट्रातील वाढती दलित अत्याचार प्रकरणे, युवाहत्या यांची त्वरीत चौकरी करुन आरोपींना त्वरीत शिक्षा व्हावी तसेच अत्याचार प्रतिबंधात्मक कायदेशीर व सरकार प्रशासन उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, महाराष्ट्रातील अनु.जाती. जमाती, मागासवर्गीय , अल्पसंख्यांक हा बहुतांशी दारीद्रयग्रस्थ उपेक्षित वर्ग असल्याने अर्थसाधने, रोजगार व इतर जिवनावश्यक बाबीची त्यांचेकडे कोरोणा लॉकडाउन कालखंडात अत्यंत बिकट अवस्था असल्याने राज्यातील या उपेक्षित घटकासाठी सरकारच्या संबंधित मंत्रालयानी त्वरीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व या वर्गाची बजेट रक्कम याच बाबतीत १०० टक्के वापरात आणावी अथवा नो बजेट लक्षात घेउन राज्यातील सर्व गोरगरीब प्राथमिक सबंधित मंत्रालये -विभागांना आदेश देन्यात यावेत, कोरोणा लॉकडाउन काळात आर्थिक मंदी व उध्वस्त गोरगरीबांचे कोटूंबिक आर्थिक बजेट विद्यार्थी यांना फी माफी करावी व खाजगी शाळांना योग्य ते आदेश द्यावे.केंद्र सरकारने देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व गोरगरीबांना आर्थिक सहाय करुन त्यांची खरेदी क्षमता वाढविण्यासाठी त्या करीता केंद्र सरकारला दारिद्रय रेषेखालील गोर गरीब परिवारांना आगामी तीन महिने प्रत्येक महिन्याला रु.५०००/ – फक्त प्रधानमंत्री केयर फंडातुन अथवा केंद्राच्या विशेष आर्थिक पॅकेजव्दारे अर्थसहाय करन्यात यावे तसेच केंद्रसरकारने कोरोणा विरोधी संघर्षात आर्थिक मंदी लक्षात घेता केंद्रसरकारने देशातील सर्व माजी खासदार – आमदार ज्यांची संपत्ती १ करोड रुपये पेक्षा जास्त आहे त्यांची आगामी तीन वर्षे तरी पेन्शन बंद करुन ही सर्व रक्कम कोरोणा संघर्षात वैद्यकिय सेवेसाठी वापरात आणावी,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे जनतेच्या ज्वलंत प्रश्नाबाबत भुमिका व बांधिलकी म्हणुन हे, निवेदन जिल्हाधिकारी मार्फतीने मा.मुख्यमंत्री सा.यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावेडी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महासचिव सदाशिव निमगडे, गड.शहराध्यक्ष मिलिंद बांबोळे, युवा नेते विवेक बारसिंगे,तुषार भडके,सतीश दुर्गमवार उपस्थित होते.




