कास्ट्राईब वनकर्मचारी संघटने च्या वतीने मा.मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) यांना विविध मागण्याचे निवेदन,
कास्ट्राईब वनकर्मचारी संघटने च्या वतीने मा.मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) यांना विविध मागण्याचे निवेदन,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी /गडचिरोली:- आज मा. सीसीएफ सा. गडचिरोली यांचे दालनात जिल्हा कास्ट्राईब वनकर्मचारी संघटने चे जिल्हाध्यक्ष मा.प्रभाकर सोंडवले यांचे नेतृत्वात निवेदन देऊन व शारीरिक अंतर ठेऊन विविध मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने वनरक्षक , वणपाल व महिला कर्मचारी यांच्या समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये सेवापुस्तक अद्यावत करणे, भामरागड वन विभागातील नियत क्षेत्रातील क्षेत्र कमी करणे, मदतनीस, कालबध्द पदोन्नती,वेतन निश्चिती यासारखे महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. त्यावर लकरात लवकर प्रश्न सोडविण्याचा विश्वास मा. सीसीएफ साहेबांनी दिला असुन, चर्चे दरम्यान मा.विवरेकर सा. उप वनसरक्षक वडसा, मुख्य लेखापाल घंटावार तर कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.नामदेव बनसोड, उपाध्यक्ष मा.रमेश घुटके, महासचिव मा.सिद्धार्थ गोवर्धन,संघटक मा.के.बी. ढवळे, गडचिरोली चे मा. सचिव धर्मराव दुर्गमवार,उपाध्यक्ष रुपेश मेश्राम हे हजर होते,तसेच वनकर्मचारी उपस्थित होते,



