लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा.
लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंडपिपरी ची मागणी
विदर्भ २४ न्युज / प्रतिनिधी
गोंडपिपरी
लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करून सर्वसामान्य शेतकरी, मजूर गोर गरिबांना दिलासा द्यावा या मागनीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंडपिपरी तर्फे रा.कॉ जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य,रा.यु.कॉ जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर,विधासभा अध्यक्ष अरुण निमजे,किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश रामगुंडे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुरज माडूरवार,जेष्ठ नेते अरुण वासलवार,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम वाघ,सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष नितेश मेश्राम,राष्ट्रवादी किसान सेल तालुका अध्यक्ष आकाश चौधरी,शरद पवार विचार मंच तालुका अध्यक्ष दिपक वांढरे,रा.यु.कॉ तालुका उपाध्यक्ष जयेश खरबनकार,शहर उपाध्यक्ष निकेश बोरकुटे,गोलू सीडाम उपस्थित होते.


