राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रा.अरुण आलेवार प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रा.अरुण आलेवार प्रथम
निबंध स्पर्धेचा विषय कोरोनारुपी महामारीच्या काळात मी आमदार असतो तर……
युवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था शिवूर, जिल्हा औरंगाबाद तर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.या निबंध स्पर्धेत खुल्या गटात प्रथम पारितोषिक प्रा. अरुण बाबुराव आलेवार यांना प्राप्त झाला. या निबंध स्पर्धेचा विषय कोरोनारुपी महामारीच्या काळात मी आमदार असतो तर. या महामारी काळात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी नियोजनबद्ध कार्य करून सर्वसामान्य लोकांना मदत करावी हा हेतू या निबंध स्पर्धेमागे होता. या निबंध स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून निबंध प्राप्त झाले.प्रा.अरुण बाबुराव आलेवार हे पेंढरी मक्ता येथील स्थायिक असून सध्या ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून भंडारा जिल्ह्यातील कोंढा कोसरा येथे कार्यरत आहेत.त्यांनी हा पारितोषिक दिवंगत भजनदास आल्यावर यांना समर्पित केले.त्यांच्या या यशाबद्दल सोशल मीडियातून प्रसंशा केली जात आहे.



