चकपिरंजी येथिल महिलांनी पकडली गावठी दारू
चकपिरंजी येथिल महिलांनी पकडली गावठी दारू
:- सावली तालुक्यातील चकपिरंजी येथील बचत गटाच्या महिलांनी गावात अवैध दारूविक्री करणाऱ्या दारूविक्रेत्या कडून 40 लिटर मोहफुलची दारू पकडली असून गावात अवैध दारू विक्रेत्यांना चांगलीच तंबी दिलेली असून दारूबंदी साठी एक पाऊल उचलले आहे.
चकपिरंजी येथे अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असल्याने गावातील दारुबंदी करण्याच्या दृष्टीने तीन दिवसा अगोदर गावातील युवक जेष्ठ मंडळीला घेऊन जे जे गावात दारू विकत आहेत त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन यानंतर तीन दिवसांनी दारू विक्री बंद करा असे सुचविण्यात आले परंतु दारू विक्रेत्याने दारू विकणे सुरूच ठेवले. गावात पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा आले परंतु काही झाले नाही शेवटी महिला मंडळीने पुढाकार घेत आज चकपिरंजी मेन रोड, शाळेची टोळी, देऊळ टोळी येथील दारू विक्रेत्याच्या घरी धाळ टाकून 40 लिटर दारू जप्त केली. दारूबंदीच्या दृष्टीने महिलांनी उचललेल्या पाऊलाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



