शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करण्यात यावे -अविनाश पाल

शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करण्यात यावे- अविनाश पाल
जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदन देऊन केली मागणी
सध्या शेतीची खरीप हंगामाची कामे सुरू झालेली असून शेती कामाला वेग आलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेती कामासाठी कर्जाची गरज आहे पण तालुक्यातील काही बँका नवीन कर्जदाराला पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे.टाळाटाळ करणार्या बँकातील शाखा अधिकारी यांच्यावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळून खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्यास शेतीची कामे करणे अडचण जाईल.
त्यासाठी शेतकऱ्याची अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्जाची गरज आहे.
त्याकरिता जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे पिक कर्ज वाटप करण्यात यावा. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अविनाशभाऊ पाल यांनी केली आहे.