Vidarbh24News

Latest Online Breaking News

बुद्ध टेकरी येथे जिवतारा फाउंडेशनची स्वच्छता मोहीम*

सावली : जिवतारा फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत बुद्ध टेकरी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. “स्वच्छता हीच खरी सेवा” व “प्लास्टिक मुक्त बुद्ध टेकरी” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या मोहिमेत एकूण २० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मोहिमेदरम्यान परिसरातील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, कागद व इतर घनकचरा साफ करण्यात आला. एकूण ४० किलो कचरा (१० पिशव्या) गोळा करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून भिखू संघावंश महाथेरो (बुद्ध गिरी टेकरी, मुल), तसेच मुल पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक मा. विजय राठोड, पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमार उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन मॅकलवार, उपाध्यक्ष रोशन गोहने, सहसचिव सतीश घोटेकर, कोषाध्यक्ष पंकज चौधरी व इतर स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!