Vidarbh24News

Latest Online Breaking News

*आज जिबगाव येथे निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर*

सावली: जिबगाव येथे कलार समाज संघटना तर्फे निःशुल्क मोतीबिंदू उपचार, शस्त्रक्रिया तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महात्मे आय बँक अँड आय हॉस्पिटल, नागपूर तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कलार समाज संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत जिबगाव सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.

शिबिराची वैशिष्ट्ये
या शिबिरात डॉ. महात्मे रुग्णालयातील अनुभवी नेत्रतज्ञांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर निवड झालेल्या गरजू रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथील डॉ. महात्मे नेत्रपीठ व रुग्णालय येथे पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांच्या नागपूर ये-जा प्रवासाची, निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था निःशुल्क करण्यात येणार आहे.

शस्त्रक्रियेसाठी येताना निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड आणि आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच सर्वांसाठी मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध राहील. गरजू रुग्णांना केवळ २०० रुपयांत चष्मा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कॅन्सर तपासणी मार्गदर्शन
या शिबिरात एचसीजी कॅन्सर सेंटर, नागपूर येथील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. नितीन बोमनवार मार्गदर्शन करणार आहेत. खालील लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे —
तोंडात किंवा जिभेत अल्सर, गाठ किंवा ट्यूमर, अन्न गिळताना त्रास, तोंड उघडताना अडचण, अनियमित रक्तस्त्राव, मासिक पाळीशी संबंधित त्रास, शरीरावर गाठी, स्तनातील गाठ किंवा मानेतील गाठ इत्यादी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी.

शिबिराची वेळ व ठिकाण
दिनांक: १२ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) वेळ: सकाळी ११ ते दुपारी स्थळ: ग्रामपंचायत सभागृह, जिबगाव

प्रमुख उपस्थिती
या शिबिराचे उद्घाटन मा. दिनेश पा. चिटनुरवार (माजी बांधकाम सभापती, जि.प. चंद्रपूर) यांच्या हस्ते होणार असून सहउद्घाटक म्हणून मा. नसिंगभाऊ गनवेणवार (सल्लागार, कलार समाज सावली) उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मा. चंदुजी मारगोनवार (माजी पं.स. मुल) असतील. दीपप्रज्वलन मा. प्रकाश पा. मारकवार (माजी सदस्य, जि.प. चंद्रपूर), मा. डॉ. नितीनजी बोमनवार (नागपूर), मा. डॉ. विजयजी शेंडे (सावली) तसेच मा. अविनाशजी तालापल्लीवार (शिक्षक, चामोर्शी) यांच्या हस्ते होणार आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांनी या आरोग्यसेवेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

:: संपर्क ::

आशिष गडपल्लीवार मो. नं. ७३५०३२८६४६

विनोद नेरलवार मो. नं. ९८३४७३२९६५

मो. नं. ९६२३४९४९३५ उमेश गोलेपल्लीवार

प्रशांत मेरफुलवार मो. नं. 9657414161

नरेश गडपल्लीवार मो. नं. 9527050793

:: आयोजक ::
श्री राकेश एम. गोलेपल्लीवार, अध्यक्ष कलार समाज संघटना ता. सावली जि. चंद्रपूर

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!