Vidarbh24News

Latest Online Breaking News

सावली येथे भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण**

“प्रसिद्ध गायक अजय देहाडे व संच यांचा बुद्ध-भीम गीतांचा जंगी कार्यक्रम”

*सावली*
शहरातील प्रभाग क्र. ०२ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ‘भीमा कोरेगाव’ विजय स्तंभाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण सोहळा तसेच माता रमाई जयंतीनिमित्त भव्य बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात नुकताच पार पडला.परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट व निळ्या झेंड्यांनी सजविण्यात आले होते.*
विजयी स्तंभाच्या प्रतिकृतीचे लोकार्पण नगराध्यक्षा साधना वाढ ई यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी मा.बांध‌,सभापती दिनेश चिटणुरवार राम मेश्राम, ता. काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुका अध्यक्षा उषा भोयर, शहर अध्यक्ष कृष्णा राऊत, विजय कोरेवार, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, माजी नगराध्यक्षा लता लाकडे, नगरसेवक विजय मुत्यालवार, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, युवा शहर अध्यक्ष अंकुश शेंडे, युवा उपाध्यक्ष नितीन दुवावार, नगरसेवक प्रितम गेडाम,भारती चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.*
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांनी आपल्या प्रतिपादनात भीमा कोरेगाव विजय स्तंभ हा शौर्य, समता आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत, सामाजिक ऐक्य आणि संविधान मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.
लोकार्पण कार्यक्रमा दरम्यान प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांनी ‘जय भीम’, ‘नमो बुद्धाय’ अशा घोषणांच्या गजरात आपल्या दमदार आवाजात बुद्ध-भीम गीतांची मैफल रंगवली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला
कार्यक्रमाचे आयोजन सावली शहर काँग्रेस पदाधिकारी व नगर पंचायत नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!