*सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने संत निरंकारी मंडळ तर्फे महाप्रसादाचे वितरण*
सावली: क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत निरंकारी सत्संग, सावली यांच्या वतीने जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सावली येथील फुले चौकात भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला व संत निरंकारी मंडळाच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी मंडळ सावली सत्संगाचे मुखी परशुराम गुरूनुले, संचालक देवराव मोहुर्ले, सेवादल जितेंद्र मोहुर्ले, केदार सोनुले, सुनील गेडाम, निराकार लेनगुरे, मुकेश मोहुर्ले, रसिक मोहुर्ले, तथागत इंदोरकर, सुभाष मडावी, शुभम गुरनुले, उर्मिला मलोडे, जमुना गेडाम यांच्यासह महाराज पतृजी गेडाम, आनंदराव चौधरी, तुकाराम वाडगुरे, ऋषी चौधरी, नूतन मोहुर्ले, शोभा मलोडे, किरण मडावी, रामरतन इंदोरकर, नागेंद्र मोहुर्ले, लीला गेडाम, शुभांगी मलोडे तसेच सावलीतील सर्व सत्संग संगतीने मोलाचे सहकार्य केले.
सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्वत्र प्रशंसनीय ठरला.



