*मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात समाविष्ट ग्रामपंचायतील महिला बचत गटाला बँक कर्ज वितरित*
सावली: तालुक्यात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान अंतर्गत एकूण 10 ग्रामपंचायतिचा समाविष्ट केलेला आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध विभागाचे काम समाविष्ट केलेले आहे जेणेकरून गावाचा विकास होईल. या अभियानात महिलांचा सर्वांगीग विकास करणे हा महत्वाचा मुद्दा समाविष्ट केलेला आहे. त्याच अनुषंगाने महिलाच्या बचत गटाच्या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तालुक्यात श्री. मुक्तेश्वर कोमलवार (गट विकास अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम सुरु आहे. या अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या समूहाला बँकेकडून कर्ज वितरित केले जातो. याच धर्तीवर महिलांच्या सर्वांगीग विकासाकरीता आज दिनांक 23/12/2025 केशरवाही येथील रेणुका महिला बचत गटाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 300000 कर्ज वितरित करण्यात आले. या प्रसंगी श्री. मुक्तेस्वर कोमलवार (गट विकास अधिकारी) यांनी जास्तीत जास्त कर्ज घेऊन स्वतःची उपजीविका निर्माण करावी व लखपती दीदी कडे वाटचाल करावी असे आव्हाहन केले. बँकेचे कु. प्राची बोडाळे शाखा व्यवस्थापक, श्री. विवेक नांगरे(BMM) श्री. पंकज गोटपर्तीवार, श्री. विवेक बुरले, सौ. पल्लवी गावतुरे उपस्थित होते. बचत गटातील महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले. आतापर्यंत तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात समाविष्ट गावातील बचत गटाला मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन स्वतःची उपजीविका निर्माण करत आहेत. भविष्यात महिलांच्या सर्वांगीग विकासाकरिता बचत गट महत्वाचे ठरणार आहे.



