संविधान दिनाचे औचित्य साधून जे. बी. ज्युनिअर कॉलेज वरोरा येथे विविध उपक्रमांचे आयोजन
बार्टी पुणेच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील समतादूत श्री. रमेश मडावी यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानाचे सामाजिक जीवनातील स्थान आणि सर्व नागरिकांनी त्याचे पालन करण्याची गरज यावर विशेष भर दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या कॉलेजच्या प्राचार्या अर्चना बनसोड मॅडम यांनी संविधानातील आजची परिस्थिती, समाजातील बदल आणि नागरिकांची जबाबदारी या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. “संविधान जोपासणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. नगराळे सर यांनी केले. तर उद्देश वाचिकेचे वाचन भाग्यश्री मेश्राम या विद्यार्थीनीने करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
तसेच सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्साहाने संविधान दौड मध्ये सहभाग नोंदवून संविधान मूल्यांप्रती बांधिलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे सर, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड सर, निबंधक अतुल लोंढे सर, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले सर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.
संविधान दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता आणि मूल्यांचे संवर्धन करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.