बालहक्कांविषयी जनजागृतीसाठी कार्यशाळा संपन्न
मूल (जि. चंद्रपूर) – दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (RUDYA) गडचिरोली यांच्या वतीने “अॅक्सेस टू जस्टीस फॉर चिल्ड्रेन” या प्रकल्पांतर्गत आनंद कनिष्ठ कला महाविद्यालय, बेंबाळ येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे मार्गदर्शन रुदय संस्थेचे संचालक मान. देवगडे सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प व्यवस्थापक प्रिया कांबळे मॅडम, समुपदेशिका राणी मेश्राम मॅडम, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाइनच्या समुपदेशिका दिपाली मसराम मॅडम तसेच सखी वन स्टॉप सेंटरच्या पॅरामेडिकल स्टाफ मनीषा देठे मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यशाळेत बालविवाह मुक्त भारत जनजागृती, बाललैंगिक अत्याचार, बालकांची तस्करी, बालमजुरी, तसेच बालकांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध सरकारी योजना आणि कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वास्तव उदाहरणांद्वारे बालहक्कांविषयीची जाणीव वाढवली.
या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, गावातील अंगणवाडी सेविका, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे यांनी केली तर आभार प्रदर्शन सौ. बनकर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथ घेऊन सामाजिक बांधिलकी व्यक्त केली.