समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेची कार्यकारिणी गठित
गडचिरोली, दि. १७ ऑगस्ट २०२५ (रविवार): सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन, गांधी चौक येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटना बळकटीकरणासाठी थेट सभेचे आयोजन करण्यात आले.

या सभेचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्ते मा. लक्ष्मण मोहुर्ले यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश महिला अध्यक्ष मा याताई मोहुर्ले उपस्थित होत्या.
सभेत संघटनेची उभारणी, वंचित, शोषित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजातील बेरोजगारी, शिक्षणातील विषमता, महिलांवरील अन्याय आणि जातीय भेदभाव यांसारख्या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी प्रतिपादन केले. सामाजिक न्याय, बंधुता, समानता व परिवर्तन या मूल्यांवर आधारित समाजरचना घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
संघटनेच्या पदनियुक्त्यांमध्ये गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी सुनील डोमाजी मोहुर्ले, जिल्हा शहर अध्यक्षपदी किशोर रामदास देवतळे, तर जिल्हा सचिवपदी योगेश जनार्धन गोरडवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच, चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्षपदी घुगुसचे अजय घनश्याम मोहुर्ले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमाला संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, सचिव किशोर नरूले, सहसचिव संदीप येनगंटीवार, नंदेश्वर कथले, संतोष कोपुलवार, महेंद्र वाघमारे यांच्यासह विविध कार्यकर्ते, युवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणाईला समाजपरिवर्तनासाठी एकत्र आणणे, जातीय भेदभावाविरुद्ध आवाज उठवणे आणि संविधानिक मूल्यांवर आधारित समाजघटना बळकट करण्याचा ठाम संदेश देण्यात आला.
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||