*रूपचंद लाटेलवार यांचा ‘उत्कृष्ट सेतू केंद्र संचालक’ म्हणून गौरव*
*शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी; तहसीलदार प्रांजली चिरडे यांच्याहस्ते सन्मान*
सावली: ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजना सहज उपलब्ध करून देण्यासाठी अविरत मेहनत घेतलेल्या सेतू केंद्र संचालक रूपचंद लाटेलवार यांना “उत्कृष्ट सेतू केंद्र संचालक” म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सावलीच्या तहसीलदार सन्माननीय प्रांजली चिरडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
रूपचंद लाटेलवार यांनी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना अंतर्गत घराघरात जाऊन लाभार्थ्यांची माहिती संकलित करत केंद्र सरकारच्या सत्यपान पोर्टलवर 100 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंदणी केली. त्यांचे हे कार्य शासन प्रशासनाकडून अत्यंत कौतुकास्पद ठरले.
लाटेलवार यांच्या सेतू केंद्रामार्फत पुढील सेवा नियमितपणे दिल्या जातात: फार्मर आयडी मोठ्या प्रमाणात तयार करणे, दरवर्षी जीवन प्रमाणपत्र नोंदणी, विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र, डोमिसाईल, नॉन क्रीमीलेयर, उत्पन्न प्रमाणपत्र, निराधार योजनांचे अर्ज भरून देणे व मार्गदर्शन करणे.
तसेच, शेतकऱ्यांसाठी पुढील महत्वाच्या ऑनलाईन सेवा देखील त्यांच्या केंद्रात पुरवल्या जातात: पी. एम. किसान योजना नोंदणी, महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज, बँक खात्याला DBT लिंक करणे, नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी, पीक विमा फॉर्म भरून देणे
रूपचंद लाटेलवार यांचे कार्य हे ग्रामीण डिजिटल सेवेचा उत्कृष्ट नमुना ठरत असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व वेळेत सेवा मिळत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे इतर सेतू केंद्र चालकांमध्येही कार्यप्रेरणा निर्माण झाली आहे.



