Vidarbh24News

Latest Online Breaking News

गडचिरोलीत लोकशाहिर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती; परिवर्तनाच्या विचारांची केली साजरी*

गडचिरोली: दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी, शुक्रवारला गडचिरोली येथील मेन चौकातील विश्राम भवन येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, गडचिरोलीच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नामवंत सामाजिक कार्यकर्ते मा .लक्ष्मण मोहूर्ले यांनी भूषविले. या कार्यक्रमात सामाजिक न्यायाच्या लढ्यात सक्रिय असलेले मा. देवाजी लाटकर, सेवा. नि.पो उप नि मा.प्रभाकर वासेकर, अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार प्राप्त मा.ज्ञानेश्वर पायघन यांची विशेष उपस्थिती लाभली.

याशिवाय संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, सचिव किशोर नरूले, सह सचिव संदीप येनगंटीवार, संतोष कोपुलवार तसेच संघटनेचे इतर कार्यकर्ते, युवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या साहित्य व समाज परिवर्तनासाठीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!