रुदय संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय बालविवाह मार्गदर्शन कार्यशाळा

सावली: दिनांक 11/07/ 2025 ला रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन (रूदय) संस्थेच्या वतीने अंगणवाडी सेविका यांचे तालुकास्तरीय बालविवाह, बाल लैंगिक शोषण, बाल गुन्हेगारी, बालमजुरी, ग्राम बाल संरक्षण समिती, गुड टच- बॅड टच इत्यादी विषयांवर तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी सुद्धा सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
वरील प्रमाणे आपल्याला काही निदर्शनास आल्यास किंवा आढळल्यास आपण आपत्कालीन टोल फ्री क्र.1098 आणि 112 वर फोन करून माहित देण्याबाबत सांगितले. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष मा. श्री. नैताम सर गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली, प्रमुख अतीथी श्री. मरसकोल्हे साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती सावली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. काशिनाथ देवगडे सर( संस्थापक सचिव, रुदय संस्था गडचिरोली) तसेच कुमारी प्रिया कांबळे , प्रकल्प व्यवस्थापक, तसेच क्षेत्रीय अधिकारी श्री. शशिकांत मोकाशे , सौ. सोनम आर. लाडे तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका मान. लेनगुरे मॅडम, मान. मोहुर्ले,अंगनवाडी पर्यवेक्षक , मान. मडावी मॅडम हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सौ. अर्चना कैलास इंदुरकर (अंगणवाडी सेविका) यांनी केला तर आभार प्रदर्शन सौ. नीलोतमा नंदकिशोर कोरडे(अंगणवाडी सेविका) यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील 150 अंगणवाडी सेविकांनी घेतला.