मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांसह वाढदिवस साजरा
गडचिरोली : दिनांक 01 जुलै 2025 रोजी मायाताई मोहूर्ले महिला प्रदेश अध्यक्षा समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विवेकानंद नगर, गडचिरोली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृध्दाचीभेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देऊन त्यांच्यासह वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी घेतलेला हा स्तुत्य उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. वाढदिवस साजरा करण्याची ही सामाजिक जाणीवेतून साकारलेली आगळी वेगळी पद्धत सर्व उपस्थितांच्या मनाला भिडली.
*”खऱ्या आनंदाचा अर्थ इतरांच्या आयुष्यात आनंद पेरण्यात आहे.”*
या सामाजिक उपक्रमात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहूर्ले, संघटनेचे पदाधिकारी विजय देवतळे, संदीप येनगंटीवार यांच्यासह अनेक समाज बांधव, भगिनी आणि मातोश्री वृद्धाश्रमातील वृध्द उपस्थित होते त्यांना फळे वाटप करण्यात आले.



