जाती धर्माच्या विळख्यातून बाहेर पडुन शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर व्हा – मायाताई मोहुर्ले
दिनांक 01/07/2025 रोजी मौजा वाकडी ता. जिल्हा गडचिरोली येथे मायाताई लक्ष्मणराव मोहुर्ले महिला राज्य अध्यक्षा समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या वाढ दिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व प्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून समाज बांधव भगिनी विद्यार्थी विद्यार्थीनी यांना जाती धर्माच्या विळख्यात जखडून न राहता जाती धर्माच्या विळख्यातून बाहेर पडुन शैक्षणिक, सामाजिक प्रगती करून राजकीय क्षेत्रात अग्रेसर व्हा असे आयोजित केलेल्या कार्यक्रमात समाज बांधव भगिनी विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मोहुर्ले, राकेश भाऊ पौरकार गडचिरोली जिल्हा अध्यक्ष समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना तसेच समाज बांधव, भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



