*गडचिरोलीत समता संघर्ष संघटनेचा गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
गडचिरोली, दि. १५ जून २०२५:
समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा – गडचिरोली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाज प्रबोधनाचा कार्यक्रम प्रबुद्ध बौद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आय.टी.आय. जवळ येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात इयत्ता १०वी व १२वी मध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व संविधान ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात यशामागील संघर्ष, प्रेरणा व भविष्यातील ध्येये याविषयी मते मांडली.

सत्कारानंतर झालेल्या समाज प्रबोधन सत्रात विविध मान्यवरांनी शिक्षण, समता, सामाजिक न्याय व संविधान मूल्यमापनावर प्रभावी विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान. किरण मडावी सर यांच्या हस्ते झाले. सह-उद्घाटक शेखर पुल्लिवार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायताई मोहूर्ले होत्या. यावेळी दिगंबर लाटेलवार सर, राजेश कलगट्टीवार, दादाजी बोलीवार, भास्कर मेश्राम, लक्ष्मण मोहूर्ले, प्रा. आलेवार, दौलत पोवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय देवतळे, सूत्रसंचालन संदीप येनगंटीवार व आभारप्रदर्शन किशोर नरुले यांनी केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, गडचिरोली शाखेच्या कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे केले. यामध्ये परमेश्वर मोहूर्ले, विजय गंगासागर, अनिल तोटपल्लिवार, संजय गोरडवार, राहुल इप्पावार, प्रमोद रामटेके, रमेश कारेवार, देवानंद कस्तावार, हेमंत रामटेके, डोमाजी मोहूर्ले, प्रभाकर गोर्लावार, सुषमा कारेवार, पुरूषोत्तम लाटेलवार, मोहनदास इटकलवार यांचा मोलाचा सहभाग होता.
या कार्यक्रमात समाज बांधव, विद्यार्थी, पालक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. एकंदरीत कार्यक्रम प्रेरणादायी व सामाजिक जाणीव जागवणारा ठरला.



