सुनील बोमनवार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक रिंगणात*
*सुनील बोमनवार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक रिंगणात*
सावली: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 10 जुलैला होवू घातली असून या निवडणुकीसाठी सावली तालुक्यातून व 1 प्रक्रिया गटातून सुनील तुकाराम बोमनवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सुनील बोमनवार यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
सुनील बोमनवार दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्हचे विद्यमान संचालक आहेत. तसेच व्याहाड (बु.) ग्रामपंचायतीचे ते माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आहेत. ओबीसी काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष असून ते खा. प्रतिभा धानोरकर यांचे निकटवर्तीय आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आले आहे, तसेच मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष आहेत. सुनील बोमानवर यांची सहकार क्षेत्रात चांगलीपकड आहे. तसेच स्व. गणपत पाटील बोमनवार बहुउद्देशीय सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक विविध उपक्रम राबविण्यात येतात. आरोग्य तपासणी शिबिर, विद्याथ्यर्थ्यांना मोफत नोटबुक असे प्रेरणादायी व प्रशंसनीय उपक्रम घेतले जातात. यामुळेच नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होतात. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार, राईस मिलचे मालक प्रशांत चिटनूरवार, अनंता चिटनूरवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचेसंचालक निखिल सुरुमवार, कृउबासचे माजी सभापती हिवराज शेरकी, नितीन
गोहणे, खुशाल लोडे आदींनी प्रोत्साहन दिले आहे.
*व्याहाड (बु.) येथील श्री किसान सहकारी राईस मिलवर सुनील बोमनवार गटाचा झेंडा*
सावली: तालुक्यातील व्याहाड (बु.) येथे 10 जून रोजी पार पडलेल्या श्री किसान सहकारी राईस मिलच्या निवडणुकीत सुनील बोमनवार यांच्या नेतृत्वातील शेतकरी राईसमिल विकास पॅनलने 11 पैकी 11 जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. श्री किसान सहकारी राईस मिल या संस्थेच्या 11 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी व्याहाड (बु.) येथील काँग्रेसचे युवा नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा संस्थेचे माजी अध्यक्ष सुनील बोमनवार यांनी शेतकरी राईसमिल विकास पॅनल तयार करून 11 उमेदवार उभे केले. तर, विरोधी गटातून प्रमोद इंगुलवार यांनी दोन जागांसाठी नामांकन दाखल केले. 10 जूनला निवडणूक पार पडली. यात सुनील बोमनवार यांच्या नेतृत्वातील शेतकरी राईसमिल विकास पॅनलचे अकराही उमेदवार विजयी झाले. यात सुनील बोमनवार, मारोती कांबळे, प्रभाकर लेनगुरे, राजू मशाखेत्री, ज्ञानेश्वर सातपैसे, बाबुराव वासेकर, विलास मेश्राम, सुचिता राजू सुरमवार, प्रेमीला राजेंद्र सातपुते, शितल वामन मोटघरे, पांडुरंग चलाख यांचा समावेश आहे. विजय संचालकांचे चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटनूरवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील चिटनूरवार, निखिल सुरमवाररोहीत बोम्मावार यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.



