सिद्धी सुरवरचे सुयश

जेईई मेन्स परीक्षेत मिळविले 93.48 टक्के गुण
सावली– माउंट ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, सावली येथील विद्यार्थिनी सिद्धी सुरमवार हिने एप्रिल 2025 मध्ये झालेल्या जेईई मेन्स परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. कोणतीही शिकवणी न लावता घरी अभ्यास करून तिने 93.48 टक्के गुण मिळवले आहेत.
सिद्धीने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या आजोबा दत्तात्रय सुरमवार यांना दिले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. गणित विषयात 95.64 टक्के, केमिस्ट्रीमध्ये 92.53 आणि फिजिक्समध्ये 98.89 टक्के गुण मिळवले आहेत.
सिद्धीच्या या घवघवीत यशाबद्दल सुनिल बेजगमवार, रुपचंद लाटेलवार, अभय सुरमवार, मिथुन सुरमवार, प्रफुल रामटेके, राजू कोसनकर, लिलाधर बांबोळे , गुलाब कावळे, सूरज मुजूमदार, राकेश विरमलवार, मंगेश सुरमवार, राकेश दंडमवार, अंजली दमके, प्रितम गेडाम, नितीन गड्डमवार, प्रमोद नागरे, गजानन मानापुरे, संदीप मेडपल्लीवार विवेक खरवडे यांनी तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धीचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.