*ॲड. गणेश ठिकरे यांची नोटरी म्हणून नियुक्ती*

सावली ( रुपचंद लाटेलवार)
सावली न्यायालयातील ॲड. गणेश यु. ठिकरे यांची भारत सरकारने नुकतीच नोटरीपदी नियुक्ती केली असुन ॲड. ठिकरे हे सावली तालुक्यातील ख्यातनाम तरूण वकिल आहेत.
ॲड. गणेश यु. ठिकरे हे मौजा पाथरी येथील उत्कृष्ठ शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. तसेच वकिली व्यवसाय करीत असतांना अनेक प्रकरणामध्ये गोर गरिबांना न्याय देण्याचे काम केले आहेत व अविरत त्यांचे प्रयत्न सुरू आहे.
त्यांच्या नोटरी नियुक्तीमुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांचे नियुक्तीमुळे सर्वसामान्याचे विधीविषयक कामे सुलभ होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.