*क्रिडांगणाच्या मागणी साठी सावलीकर एकवटले

*शहर कळकळीत बंद ; वनविभागावर मोर्चा**
सावली, बाबा मेश्राम*
सावली शहरा करिता क्रिडांगणा च्या मागणीसाठी सावलीकरानी एकत्र येत (दि 17) रोजी सावली शहर कळकळीत बंद ठेऊन वन विभागावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात हजारो सावलीकर सहभागी झाले होते.
शहरातील नगरपंचायत हद्दीतील व योगी नारायण बाबा मठ लगतचे मोकळे मैदान स.क. ७९८ याचा वापर सर्व सावलीकर, आबालवृध्द, खेळाडू, पोलीस व सैन्यात प्रवेश ईच्छुक युवक युवती गेल्या पाच वर्षापासुन किडांगण म्हणुन करीत आहेत. या मैदानावर गेल्या पाच वर्षात अनेक प्रकारच्या किडा स्पर्धा, पोलीस विभागाची सद्भावना किडा स्पर्धा, पालकमंत्री चषक, नगरपंचायत चषक, सावली लिग आदींचे आयोजन करण्यात येत आहे. सावली शहराला कोणतेही अधिकृत किडांगण उपलब्ध नसल्याने याच मैदानाचा उपयोग करतात.
मात्र सावली तालुक्यातील आदिवासी समाज संघटनांनी याच मोकळया मैदानाची मागणी आदिवासी मुले व मुलींच्या वस्तीगृहासाठी वनविभागाकडे केली, त्यांच्या मागणीची दखल घेवून दि. १७/२/२०२५ ला विभागीय वन अधिकारी, वनविभाग चंद्रपूर यांच्या पत्र कं. कक्ष १४/सर्व्हे/जमीन २०१९ अन्वये मौजा सावली येथील सदरचे सर्व्हे क. ७९८ मध्ये किडांगण निर्माण करण्याच्या विरोधात आदिवासी समुदाय असल्याच्या आशयाचे पत्र निर्गमित करण्यात आल्याने प्रशासनाकडुन किडांगणसाठी राखीव असलेली जागा रद्द होणार असल्याची माहिती सावलीकरांना समजली. यामुळे संपुर्ण सावली करांनामध्ये रोष पसरला आहे. ज्या मैदानात परिश्रम करून क्रिडांगण तयार केले,तिथेच किडांगणच तयार व्हायला पाहिजे अशी सावलीकरांची आक्रमक मागणी सावली करानी केली आहे.
नगरपंचायत हद्दीतील व योगी नारायण बाबा मठ लगतच्या सर्व्हे नं. ७९८ वरील मोकळे मैदान फक्त नियोजीत किडांगणासाठी राखीव असायला पाहिजे व त्याच ठिकाणी किडांगण मंजुर करण्यात यावे या मागणीसाठी सावली येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
————————————-
सावली शहर पेसा अंतर्गत येत नसल्याने योगी नारायण बाबा जवळील मैदान क्रिडांगणा साठीच राखीव राहणार असून त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.
– प्रशांत खाडे
विभागीय वन अधिकारी चंद्रपूर