*सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे आयोजन*

*महावीर इंटरनॅशनल सावली केंद्राचा पुढाकार*
सावली: लायन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर, केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली हे सेंटर सामाजिक उपक्रम जोपासत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तपासणी विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर (दि 09) फेब्रुवारी 2025 रोजी रविवारला दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात रेशनकार्ड धारकांची मोफत मोंतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी येणाऱ्या रुग्णांनी येताना रेशन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, तसेच मधुमेहाची किंवा रक्तदाबाची औषधे सुरू असल्यास ती सोबत आणावी. तरी सर्व गरजू नागरिक बांधवानी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि (दि 09) तारखेच्या आत नोंदणी करावी असे आवाहन महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली तर्फे करण्यात येत आहे.