Vidarbh24News

Latest Online Breaking News

*”माझा बूथ माझी जबाबदारी’ हाच खरा विजयाचा मुलमंत्र – विजय वडेट्टीवार*

*सावली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक*

सावली: ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात गेल्या दहा वर्षापासून मी जे काँग्रेस पक्षाची फळी निर्माण केली त्याला अजिबात तोड नाही. मी जोडलेला प्रत्येक कार्यकर्ता हा मला त्याच्या कुटुंबातील सदस्य समजतो. मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाशी माझी नाळ जुळली आहे. तर लोकसभा निवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला यामुळें ब्रह्मपुरी मतदार संघात भाजप कडून जातकारणाचे विष पेरण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू आहे. अशा कूटनीतीतून रचलेल्या जातकारण्याच्या षडयंत्राला थारा न देता प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांने मीच उमेदवार म्हणून “माझा बूथ माझी जबाबदारी’ पार पाडावी. हाच खरा विजयाचा मूलमंत्र होय असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील हिरापूर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत दिनांक 6 नोव्हेंबर बोलत होते.

ते पुढें बोलतांना म्हणाले की, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा गेल्या दहा वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर केवळ पोकळ आश्वासने, भूल थापा व एक-दोन लाखांची कामे करून त्यातही कमिशन खोरी करणाऱ्या भाजपच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी जनतेला मूर्ख बनविण्यापलीकडे काहीच केले नाही. यामुळे जनतेने गेल्या दहा वर्षात संपूर्ण विधानसभा क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर टाकून जो विश्वास दाखविला त्या विश्वासावर खरा उतरत जन आशीर्वादाच्या बळावर मी क्षेत्रात समृद्धी शेतीसाठी गोसेखुर्द व घोडाझरी धरणाचे पाणी पोहोचविले. शुद्ध पेयजनासाठी गावोगावी पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. रस्ते, सामाजिक सभागृहे, वाचनालये ग्रामपंचायत भवन, प्रशासकीय कार्यालयासाठी प्रशस्त इमारती, आरोग्य केंद्रांसाठी प्रशस्ती इमारती, रुग्णवाहिका, बस स्थानक, अशा अनेक सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी शासन स्तरावरून खेचून आणला. यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विकास क्रांती घडून आली. विरोधी बाकावर बसून विधानसभा सभागृहात सत्ताधाऱ्यांना घाम फोडून मी जे कार्य केले यामुळे जनता सदैव माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. तर वाढती लोकप्रियता व मला क्षेत्रात मिळणारे प्रचंड समर्थन हे बघून विरोधकांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे काही भाट येथे येऊन जातकारण्याचे विष पेरणाचे काम करीत आहे. मात्र माझ्या विधानसभा क्षेत्रात सर्वधर्मसमभाव सर्व समाज बांधवांना समान न्याय , व सर्वांना समान वागणूक देणारा लोकप्रतिनिधी अशी माझी ओळख असून मला अशा भाटांच्या कटकारस्थानांचा तीळमात्र ही फरक पडणार नाही. माझा कार्यकर्ता माझ्या पक्षाची रक्तवाहिनी असून माझी काँग्रेसची फळी अतुट बांधल्या गेली आहे. येणाऱ्या निवडणुकीत माझ्यावर राज्याच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी असल्याने आपण खुद्द माझा बूथ माझी जबाबदारी व मीच उमेदवार या मूलमंत्राने जोमाने काम करा. म्हणजे आपला नक्कीच विजय होईल असेही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.यावेळी मार्गदर्शनपर बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मीच उमेदवार अशी जबाबदारी स्वीकारावी व यावेळी क्षेत्रातून सर्वाधिक विक्रमी विजयी मते सावली तालुक्यातील राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, सूत्रसंचालन सचिन शेंडे यांनी केले.
आयोजित बैठकीस पांडुरंग पा. तांगडे, राजेश सिद्धम, प्रशांत गाडेवार उषा भोयर, राकेश गड्डमवार , अवधूत कोठेवार, विजय कोरेवार, विजय मुत्यालवार, लता लाकडे, मुन्ना स्वामी, किशोर कारडे, पुरुषोत्तम चुधरी, मनोहर ठाकरे, गोपाल रायपुरे, कृष्णा राऊत, यशवंत ताडाम, रोशन बोरकर, नितिन दुव्वावार, अमरदिप कोनपत्तीवार तसेच सावली तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, बूथ प्रमुख तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!