सावली शहरात नवरात्री महोत्सव निमित्ताने विविध स्पर्धा
शारदीय नवरात्र उत्सवात आकर्षक रोषणाई व मंडप सजावट,भक्तीमय वातावरण”
*सावली*
सावली शहरात नवरात्री महोत्सवच्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,या मध्ये नवरात्री क्वीन स्पर्धा,संगीत खुर्ची(महिला),भव्य घागर बॉलेसिंग स्पर्धा,नवकन्या भोजन,लहान मुले,मुलींची मटका फोड आणि संगीत खुर्ची,बलुन गेम (महिला),आणि नारी शक्ती दर्शन यांवर आधारित रांगोळी स्पर्धा, ईत्यादी स्पर्धेत महिलांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला,
घटस्थापना आणि शारदीय नवरात्री ला ३ आक्टों. ला सुरुवात झाली, दहा दिवस सुरू असलेल्या या उत्सवात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,माताराणी शारदा उत्सव मंडळ ,सावली च्या वतीने नवरात्री महोत्सव२०२४ चे आयोजन करण्यात आले होते,विविध स्पर्धेत आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली होती.आकर्षक रोषणाई व मंडप सजावट यामुळे वातावरण भक्तीमय दिसत होते.
माताराणी शारदा उत्सव मंडळ ,सावली च्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना ओंकार इलेक्ट्रिकल (प्रोपा .बालाजी कन्नावार ) आणि निलम.एन. सुरमवार,नगरसेविका न.प.सावली ,यांच्या कडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
मॉं शक्ती शारदा उत्सव मंडळ ,प्रभाग क्र.१२ च्या वतीने ,शारदीय नवरात्री उत्सव निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,यात संगीत खुर्ची, बलुन इन.लेग्ज, बॉल इन बॉक्स
लेग्ज स्टिकर्स इन मॉट,ग्लास विथ बलुन ,ग्लास पिरॅमिड, फॉन्सी ड्रेस, रॉम्प वॉक, गर्भा डॉन्स आदी स्पर्धा घेण्यात आल्या तर रविवारी ऑकेस्टा आणि महाप्रसादाचे सुध्दा आयोजन करण्यात आले,
विविध स्पर्धेत विविध महिला स्पर्धकांनी सहभागी होऊन आनंदी व्यक्त केला, भक्तीमय वातावरण व आकर्षण रोषणाई ने परीसर उजळून गेलेला दिसत होता.