हत्तीच्या कळपाने नुकसान झालेल्या धानपिकांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या..
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांची मागणी”
*सावली*-गडचिरोली जिल्ह्यातुन वैनगंगा नदी ओलांडून २५ ते ३० हत्तींचा कळप सावली तालुक्यात दाखल झाला असून वनपरिक्षेत्रार्तंगत येणाऱ्या उपवन व्याहाड खुर्द क्षेत्रातील सामदा बिटातील शेतशिवारात धुडगुस करीत धानपिकांचे नुकसान करीत आहे, या परीसरातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसान झालेल्या धानपिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्याध्यक्ष अविनाश पाल यांनी यांनी वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या मार्फत निवेदन देऊन केले आहे.
सामद बुज वनबिटातील शेतशिवारात हत्तीच्या कळपाने अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान केले आहे, यात रुमाजी कोहळे यांच्या तीन एकरातील धानपिकांचे नुकसान झाले तर ,शेती लागुन असलेल्या सुधीर देशमुख ,प्रविण देशमुख ,बुरले आदी शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान झाले आहे ,त्यामुळे त्या धानपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निवेदन अविनाश पाल यांनी दिले ,यावेळी वनसंरक्षक रामगावकर,सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेडकर,सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे आदी उपस्थित होते.