*आज पासून ग्रामपंचायत सदस्याचे बेमुदत उपोषण
_गावात समस्यांचे डोंगर,सरपंच सचिवाचे दुर्लक्ष_
एटापल्ली तालुक्यातील नामांकित असलेल्या जारावंडी ग्रामपंचायत मध्ये पायाभूत समस्यांचा डोंगर उभा झाला असल्याने समस्या तात्काळ सोडविण्यासाठी जारावंडी ग्राम पंचायतचे सदस्य मुकेश कावळे यांनी आजपासून ग्राम पंचायत जारावंडी समोर उपोषण करणार आहे
एटापल्ली तालुक्यातील नामांकित आणि आर्थिक स्वबळाने मजबूत ग्राम पंचायत म्हणून जारावंडी ग्राम पंचायत ची ओळख आहे परंतु याच ग्राम पंचायतीमध्ये समस्यांचा डोंगर उभा झाल्याने गावातील नागरिकांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे
यात आठवडी बाजारात संपूर्ण चिखलच चिखल झाले आहे आणि तिथे अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध नाही
आणि गावात या वर्षी जल जीवन मिशन अंतर्गत पाईप लाईन च काम झाले परंतु संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संपूर्ण गावात पाईप फुटले आहेत आणि अनेक घरे पाणी मिळण्या पासून वंचित आहेत
आणि त्याच कामा करिता अनेक ठिकाणी रस्ते फुटून गेले आहेत,आणि सदर कामामुळे गावातील नाल्या मातीने तुडुंब भरलेले आहेत,ते संपूर्ण नाल्या आणि रस्ते संबंधित कंत्राटदारा मार्फत सुरळित करणे अपेक्षित होते तसेच गेल्या दोन तीन वर्षांपासून वासुदेव कोडापे आणि गुरुदास टिंगुसले यांच्या घरासमोरील अत्यंत धोकादायक विद्यत खांब तात्काळ हटविण्याची मागणी केली परंतु आज पर्यंत तो खांब हटविलेला नाही त्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे
तसेच प्राथमिक आरोग्य पथक येथे पिण्याच्या पाण्याची सोय आणि अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध नाही,पिण्याच्या टाकीजवळ तलावात असलेले शेणाचे ढिगारे आहेत,आणि ते शेण पूर्ण पाण्यातुन पिण्याच्या टाकी मध्ये जात आहे,आणि जारावंडी येथे प्रवासी निवाऱ्याची सोय नाही सार्वजनिक खेळाचे मैदान साफ सफाई करणे असे असंख्य समस्या गावात असून याकडे सरपंच आणि ग्राम सचिव यांचे दुर्लक्ष झाले आहे
या समस्यांबद्दल ग्रामपंचायत चे सदस्य यांनी अनेकदा निवेदन आणि मासिक सभेमध्ये ठराव आणि चर्चा सुद्धा करण्यात आली परंतु काहीच तोडगा निघाला नसल्याने नाईलाजाने आज पासून ग्रामपंचायत कार्यालया उपोषण करणार आहेत
_मी अनेकदा सरपंच आणि सचिवाला सदर समस्यांच्या निराकरणा संदर्भात निवेदन दिले आणि अनेकदा चर्चा सुद्धा केला परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने बेमुदत उपोषण करीत आहे_