ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी अविनाश पाल यांना देण्यात यावी
“कार्यकर्त्यांची मागणी”
“पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व मा.खा.अशोक नेते यांना उमेदवारचे निवेदन केले सादर”
*सावली*-भारतीय जनता पार्टी कडून ७३-ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी सावली तालुक्यातील अविनाश जोगेश्वर पाल यांना देण्यासाठी सावलीचे प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांनी निवेदनाद्वारे ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार वने संस्कृती कार्य, व मत्स्व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री,माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या कडे केली.
मागील काळात सावली विधानसभा क्षेत्र असतांना व आता ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्र असतांना एकदाही सावली तालुक्याला भाजपाची उमेदवारीच प्रतिनिधीत्य मीळाली नाही. मागील ३ टर्म उमेदवारी मागीतली होती त्यामुळे सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला व सावली तालुक्याला प्रतिनिधीत्व देण्यात यावे श्री. अविनाश पाल हे १० वर्ष पं. सं. सदस्य म्हणून काम केले ८ वर्ष भाजपा तालुका अध्यक्ष पदाची धुरा यशस्वी रित्या सांभाळून पक्ष सघंटन मजबूत केले बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी चांगली कामगीरी केली आहे. ते व्यवसायाने विमा अभिकर्ता असल्याने त्यांचा सिंदेवाही, ब्रम्हपूरी व सावली तालुक्यात त्यांचा दांडगा परिचय आहे त्याच सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात वर्चस्व असून त्याच्या कार्याच्या माध्यमातून ब्रम्हपूरी विधानसभेवर भाजपाचा झेंडा जिंकून दाखवू त्या करिता ब्रम्हपूरी क्षेत्रातील स्थानीक व्यक्ती अविनाश जोगेश्वर पाल यांना उमेदवारी देण्यात यावी.
यावेळी तालुक्यातील भाजपा चे जेष्ठ नेते माजी जि प सदस्य भालचंद्र बोदलकर, माजी तालुका अध्यक्ष दौलत भोपये,माजी प स सदस्य गणपत कोठारे, किशोर वाकुडकर, मोहन चन्नावार, कविंद्र रोहणकार, अरून पाल,सदाशिव बोबाटे,जितेश सोनटक्के, नितीन कारडे, दादाजी किनेकर,मोतीराम चिमुरकर,मुक्तेश्वर थोरात, दिवाकर म्याकलवार,प्रविण देशमुख,नितीन टेप्पलवार,विलास कावळे,जगदिश हेटकर ,पदमाकर इंगोले, ब्रमानंद शेंडे, अतुल ठाकुर, नरेश बाबनवाडे,राकेश गोलेपल्लीवार,डियेज आभारे, राजु धोटे, प्रकाश नागापुरे,सुखदेव मोहुर्ले,किशोर खेडेकर, देवराव चिताडे, दिपक शेंडे, देवानंद पाल,प्रंशात मडावी शरद मडावी,तुळशिदास भुरसे, दिलीप चलाख ,मिथुन बोदलकर,खुशाल हुलके,गिरीधर शेंडे,अभि हजारे च्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते