प्रवीणभाऊ आडेपवार विद्यालयाचा खो -खो संघ जिल्हा स्तरावर*
*प्रवीणभाऊ आडेपवार विद्यालयाचा खो -खो संघ जिल्हा स्तरावर*
सावली –
क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र् राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर,तालुका क्रीडा कार्यालय सावली यांच्या संयुक्त विद्यमाने पेंढरी मक्तात शालेय क्रीडा स्पर्धचे आयोजन करण्यात आले.संत गजानन महाराज विद्यालयाच्या मैदानात झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या खो -खो स्पर्धेत प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफंद्रा हे विजयी झाले. प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयाने कापसी संघाचा पराभव करीत विजय संपादन केला व तालुक्यात प्रथम स्थान पटकाविले.चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरिय खो खो स्पर्धेत सावली तालुक्याचे प्रतिनीधीत्व करणार आहे.विजयी संघाचेशाळेचं संस्थापक विजय आडेपवार,संस्थेचे अध्यक्ष गजानन यंनगदलवार,सचिव रवींद्र आडेपवार,मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार व सर्व समिती चे पदाधिकारी व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.