**विद्यार्थी शालेय गणवेश विना*
“व्यथा जिल्हा परिषद शाळांचा””
शाळेचा अडीच महिन्याचा कलावधी लोटला
*सावली*-प्राथमिक, माध्यमिक, शाळा.सुरू झाल्या,पाहता पाहता शालेय शिक्षणाचे अडीच महिने आटोपत असतानाही जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थी गणवेशापासुन वंचित असल्याचे चित्र सर्वींकडे दिसत आहे,त्यामुळे शाळा व्यवस्थापनासह पालक सुध्दा गणवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
दरवर्षी केंद्र सरकार कडून प्रती विद्यार्थी दोन गणवेशाचा निधी महाराष्ट्र सरकारला येतो,सदर निधी महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद शाळा समिती कडे जमा करीत होती,आणि शाळा समिती आपल्या जवळील ट्रेडर्सला त्याचे.आर्डर.देऊन शाळेच्या पहिल्या आठवड्यात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्याची दक्षता घेत होते, जिल्हा परिषद शाळेतील ईयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके आणि गणवेश दिल्या जातात.
या वर्षी २०२४ ह्या चालु सत्रात महाराष्ट्र शासनाने एकाच पुरवठादाराला गणवेश पुरवण्या संदर्भात आर्डर दिली.त्यामुळे त्या पुरवठा दाराला मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्हा परिषद शाळांना वेळेवर गणवेश तयार देता आले नाही, त्यातच एकाच पुरवठा दाराला सदर आर्डर.दिल्याने हजारो ट्रेडर्स चे नुकसान सुध्दा झाले,त्यांच्या हाताचे काम गेल्याने त्यांना सुद्धा आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णया प्रमाणे शाळेची घंटा वाजली त्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे, असे असतानाही जवळ जवळ अडीच महिन्याचा कालावधी झालेला आहे. परंतु अजुन ही विद्यार्थी गणवेशा पासुन वंचित आहे., शासनाच्या एकाच पुरवठादारांना आर्डर दिणे,या चुकीच्या निर्णयामुळे स्वातंत्र्य दिनी सुध्दा विद्यार्थ्यांना गणवेश मिळु शकले नाही.
त्यामुळे शालेय विद्यार्थी , त्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती सह शिक्षक नाराज आहेत . तसेच शासनाच्या चुकीच्या निर्णयाने हजारो व्यापाऱ्यांच्या व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
————————————————-
शाळा.सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे, परंतु पुरवठा दाराकडुन अजूनही गणवेश किंवा कापड आला नाही, जि.प.शाळेत गोरगरीब ,कामगार, मजुरांचे मुले.शिक्षण घेतात,त्यांना वेळेवर साहित्य उपलब्ध करून देणे ,याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे…
. नितेश रस्से,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,जि.प.उच्च श्रेणी प्राथ.शाळा नं१,सावली, ता.सावली जि.चंद्रपूर
…… …… …. …
नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना या वर्षी गणवेश मिळाला नाही, आमच्या मजुरवर्ग पालकांच्या समस्या ,परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने त्वरीत गणवेश उपलब्ध करून द्यावा..
राजेश गावतुरे,पालक,सावली